Maharashtra Corona Update : राज्यात आज पन्नासपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) पन्नासपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू झाले आहेत. आज 41 नवीन रुग्ण वाढले असून, 87 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. 

 

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 75 हजार 211 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 26 हजार 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 732 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजवर 1 लाख 47 हजार 816 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 97 लाख 05 हजार 301 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.