Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात दहा हजारांहून कमी रुग्ण, 200 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात सोमवारी (दि.14) दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 8 हजार 129 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 200 रुग्णांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 17 हजार 121 एवढी झाली आहे. त्यापैकी 56 लाख 54 हजार 003 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 14 हजार 732 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 95.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांच्या खाली आली आहे. आजघडीला राज्यात 1 लाख 47 हजार 354 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 200 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 12 हजार 696 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 82 लाख 15 हजार 492 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 49 हजार 251 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 997 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.