Maharashtra Corona Update : राज्यात आज दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज 1 हजार 924 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 92 हजार 683 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 18 लाख 90 हजार 323 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 50 हजार 680 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 173 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 35 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज दिवसभरात दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून अडीच ते तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असताना आज दिवसभरात झालेली रुग्ण वाढ कमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.