Maharashtra Corona Update : सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

एमपीसी न्यूज – राज्यात दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 19 हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे.

आज दिवसभरात 18 हजार 317 नविन रुग्णांची नोंद झाली असून 19 हजार 163 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज 78.61 टक्के नोंद झाली आहे.

आतापर्यंत 10 लाख 88 हजार 322 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 59 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 481 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 67 लाख 88 हजार 205 नमुन्यांपैकी 13 लाख 84 हजार 446 नमुने पॉझिटिव्ह (20.40टक्के) आले आहेत. राज्यात 21 लाख 61 हजार 448 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 29 हजार 147 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात राज्यात पाच ऑक्टोंबरपासून रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार सुरू होणार आहेत. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारने रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.

महाराष्ट्रात लाॅकडाऊन 31 ऑक्टोंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र नियम आणखी शिथिल करत 50 टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट सुरू करता येणार आहेत. तसेच मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.