Maharashtra Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारहून अधिक रुग्ण, आज 4430 रुग्ण कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update: More than five thousand patients for the second day in a row, today 4430 patients are corona free एकूण कोरोना बाधितांपैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

एमपीसी न्यूज- राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात आज 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात झपाट्याने रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आज 4,430 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.94 टक्के एवढे आहे.

राज्यात आज 167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 86 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 81 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, जळगाव 5, धुळे 4, अहमदनगर 2, नाशिक 2, वसई विरार 1, पिंपरी चिंचवड 1, जालना 1 आणि लातूर 1 यांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 4.57 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 8,96,847 नमुन्यांपैकी 1,59,133 नमुने पॉझिटिव्ह आलेत. राज्यात 5,65,161 लोक होम क्वारंटाइन आहेत आणि 36,925 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

कोरोनामुळे  चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.