Maharashtra Corona Update : राज्यात आज दहा हजारांहून अधिक रुग्ण, 237 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली होती. आज बुधवारी (दि.16) मात्र, महाराष्ट्रात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात दिवसभरात 10 हजार 107 कोरोना रुग्ण सापडले असून, 237 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 लाख 34 हजार 880 एवढी झाली आहे. त्यापैकी 56 लाख 79 हजार 746 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 10 हजार 567 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

आजघडीला राज्यात 1 लाख 36 हजार 661 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 237 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 15 हजार 390 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.70 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 86 लाख 41 हजार 639 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 8 लाख 78 हजार 781 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 401 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.