Maharashtra Corona Update: कोरोना संसर्गात मुंबई चीनच्याही पुढे!

Maharashtra Corona Update: Mumbai ahead of China in corona infection! राज्यात आज 5368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, आज 3522 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज –  कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबई चीनच्या पुढे गेली आहे. चीनमध्ये 85 हजार 320 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मुंबईत आतापर्यंत 85 हजार 724 जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईतील सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या हा दिवसेंदिवस अधिकच चिंतेचा विषय बनत चालला आहे.

राज्यात आज 5 हजार 368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 11 हजार 987 इतकी झाली आहे. आज 3 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 15 हजार 262 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 87 हजार 681 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 204 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 35 हजार 447 नमुन्यांपैकी 2 लाख 11 हजार 987 (18.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 265 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 46 हजार 355 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 3 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.37 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 262 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 204 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.