Maharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर ; आज 11,141 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात 11 हजार 141 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 38 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 19 हजार 227 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 68 हजार 044 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 6 हजार 013 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.17 टक्के झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या राज्यात एकूण 97 हजार 983 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 478 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.36 टक्के एवढा आहे. राज्यात 4 लाख 39 हजार 055 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 650 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.