Maharashtra Corona Update: कोरोनामुक्तांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर, सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण दुप्पट

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84 टक्के आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या 24 तासांत राज्यात 8,522 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 15 हजार 356 रुग्ण बरे होऊन गेले. काल देखील राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट होती. सलग दुसऱ्या दिवशीही हा कल कायम राहिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

 राज्यात आज 187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना बळींचा आकडा 40 हजार 701 झाला आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या 2.64 टक्के आहे. 

 राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 43 हजार 837 झाली आहे. त्यापैकी 12 लाख 97 हजार 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या दोन लाख पाच हजार 415 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.