India Corona Update : देशातील कोरोनाबाधितांची संख्या 62 लाखांच्या पुढे, 24 तासांत 80,472 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 62 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 80 हजार 472 नव्या कोरोना रुग्णांची नोंद वाढ झाली आहे तर, 1,179 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 62 लाख 25 हजार 764 एवढी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 40 हजार 441 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 51 लाख 87 हजार 826 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत 97 हजार 497 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 10 लाख 86 हजार 688 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 7 कोटी 41 लाख 96 हजार 729 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

15 लाख चाचण्या दररोज करण्याची क्षमता देशात आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की दररोज 15 लाख चाचण्या होतीलच. प्रत्येक भागात त्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गाच्या प्रमाणावर चाचण्यांचे प्रमाण अवलंबून असते. दुसऱ्या बाजूला सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवड्याची सरासरी पाहिली असता दर आठवड्यात दहा लाखाच्या आसपास चाचण्या पूर्ण झाल्याचे दिसून येईल असा खुलासा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दररोज कमी जास्त होणा-या चाचण्यांच्या प्रमाणावर केला आहे.

आयसीएमआरने केलेल्या दुसऱ्या सिरो सर्वेनुसार देशातील बहुतांशी लोकसंख्या अजूनही कोरोना संक्रमणाच्या दृष्टिकोनातून असुरक्षित आहे. त्यामुळे, अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.