Maharashtra Corona Update : दोन दिवसांत एक लाख रुग्णांना डिस्चार्ज, 47 लाख रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात नव्यान वाढ होणा-या रुग्णापेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. मागील दोन दिवसांत राज्यात एक लाख बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 47 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आज (दि.14) राज्यात 39 हजार 923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 लाख 09 हजार 215 झाली असून, त्यापैकी 47 लाख 07 हजार 980 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात 53 हजार 249 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या राज्यात 5 लाख 19 हजार 254 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 695 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 79 हजार 552 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे तर, राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 88.68 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात 34 लाख 82 हजार 425 जण होम क्वारंटाईन आहेत.  तर, 28 हजार 312 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत तब्बल तीन कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत 3 कोटी 06 लाख 02 हजार 140 नमूने तपासण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. आज नोंद झालेल्या रुग्णांची संख्या पाहता राज्यात संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.