Maharashtra Corona Update : राज्यातील 17.68 लाख रुग्णापैकी 16.42 लाख झाले कोरोनामुक्त

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 5 हजार 640 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाख 68 हजार 695 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी 16 लाख 42 हजार 916 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्यात आज 6 हजार 945 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात सध्या 78 हजार 272 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.88 टक्के एवढा आहे तर, मृत्यूदर 2.66 टक्के एवढा आहे.

राज्यात एक कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 1 कोटी 35 हजार 665 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 17 लाख 68 हजार 695 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 58 हजार 090 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 883 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी 16 हजार 531 सक्रिय रुग्ण पुण्यात तर, ठाण्यात 14 हजार 262 व मुंबईत 11 हजार 822 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवाळीनंतर राज्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.