Maharashtra Corona Update : रुग्ण घट कायम ! दिवसभरात 14,123 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची घट कायम असून, आज (मंगळवारी) राज्यात 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत आज जवळपास एक हजार रुग्णांची घट झाली आहे. तसेच आज 35 हजार 949 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 57 लाख 61 हजार 015 इतका झाला आहे. त्यापैकी 54 लाख 31 हजार 319 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, सध्या राज्यात 2 लाख 30 हजार 681 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात आज नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृतांची संख्या अधिक आहे. सोमवारी राज्यात 184 मृतांची नोंद झाली होती तर, आज (मंगळवारी) 477 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

आत्तापर्यंत 96 हजार 198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 94.28 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 52 लाख 77 हजार 653 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 17 लाख 68 हजार 119 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 9 हजार 315 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.