Maharashtra Corona Update : रुग्ण वाढीचा वेग पुन्हा वाढला ! आज 15,817 नवे कोरोना रुग्ण

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1.10 लाखांवर

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. दररोज वाढ होणा-या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात 15 हजार 817 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. या वाढीसह राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1.10 लाखांवर पोहचली आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 82 हजार 191 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 17 हजार 744 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 11 हजार 344 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात सध्या 1 लाख 10 हजार 485 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज दिवसभरात 56 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 723 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.31 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79 टक्के झाले आहे.

आजपर्यंत राज्यात 1 कोटी 73 लाख 10 हजार 586 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 22 लाख 82 हजार 191 सकारात्मक आले आहेत. राज्यात 5 लाख 42 हजार 693 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 884 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.