Maharashtra Corona Update : रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, आज 21,776 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यात आज (शनिवारी) 21 हजार 776 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 55 लाख 28 हजार 834 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आज दिवसभरात 13 हजार 659 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 19 हजार 224 इतका झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 88 हजार 027 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्रात आज 300 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आत्तापर्यंत 99 हजार 512 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.71 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 62 लाख 71 हजार 483 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 14 लाख जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 093 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात अनलॉकचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल. पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे, दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे, तिस-या 10 जिल्हे आणि चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.