Maharashtra Corona Update : धडकी भरवणारी रुग्णवाढ, आज 63,294 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात झालेली रुग्ण वाढ धडकी भरवणारी आहे. दिवसभरात तब्बल 63 हजार 294 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, ही आजवरची सर्वाधिक एकदिवसीय रुग्ण वाढ आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 34 लाख 07 हजार 245 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 27 लाख 82 हजार 161 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 34 हजार 008 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.65 टक्के एवढं झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात सध्या 5 लाख 65 हजार 587 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 349 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 57 हजार 987 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.70 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 31 लाख 75 हजार 585 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 25 हजार 694 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 14 हजार 372 नमूने तपासण्यात आले आहेत.

राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी (दि.14) होणा-या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री अर्थ विभाग आणि इतर विभागाबरोबर बैठक घेणार असून, बुधवारी कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, कोविडचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत घेतली ई-बैठक. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सहभागी झाले होते. कडक निर्बंध लावण्यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.