Maharashtra Corona Update: राज्यात रुग्णवाढीचा दर 7 वरून 4.15 टक्क्यांवर – राजेश टोपे

Maharashtra Corona Update: State's patients growth rate rises from 7 to 4.15 per cent - Rajesh Tope

  • राज्यात कोरोनाबाधित 996 रुग्ण बरे होऊन घरी परतले
  • आतापर्यंत 32 हजार 329 रुग्णांना घरी सोडले
  • राज्यात कोरोनाच्या 39 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू

एमपीसी न्यूज – राज्यात काल (बुधवारी) 996 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 32 हजार 329 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 2560 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 39 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात 46 शासकीय आणि 36 खाजगी अशा एकूण 82 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 97 हजार 276 नमुन्यांपैकी 74 हजार 860 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 71 हजार 915 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 71 हजार 912 खाटा उपलब्ध असून सध्या 33 हजार 674 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दि. 1 मे ते 1 जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि. 1 जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (4.74 टक्के) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- 60 (मुंबई 49, उल्हासनगर 3, ठाणे 2, नवी मुंबई 3, वसई विरार 1, भिवंडी 1, मीरा भाईंदर- 1, नाशिक- 8 ( धुळे 4, जळगाव 2, अहमदनगर 1, नंदूरबार 1), पुणे- 29 (पुणे 19, सोलापूर 10), कोल्हापूर- 2 (कोल्हापूर 2) औरंगाबाद- 17 (औरंगाबाद मनपा 16, जालना 1), लातूर- 1 (उस्मानाबाद 1), अकोला-2 (अकोला 2), इतर राज्ये – 3 (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.)

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 51 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 122 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 69 रुग्ण आहेत तर 46 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 122 रुग्णांपैकी 88 जणांमध्ये (72 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2587 झाली आहे.

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 57 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू 30 एप्रिल ते 31 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 65 मृत्यूंपैकी मुंबई 30,सोलापूर -10, औरंगाबाद -6, नवी मुंबई -3, धुळे -3, जळगाव -2, कोल्हापूर -2, ठाणे 2, अहमदनगर -1, अकोला 1, नंदूरबार -1,पुणे 1 , उल्हासनगर 1, वसई विरार -1 आणि उत्तर प्रदेशमधील 1 असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (43,492), बरे झालेले रुग्ण- (17,472), मृत्यू- (1,417), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(6), ॲक्टीव रुग्ण- (24,597)

ठाणे: बाधित रुग्ण- (10,865), बरे झालेले रुग्ण- (3,992), मृत्यू- (240), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (6,633)

पालघर: बाधित रुग्ण- (1,199), बरे झालेले रुग्ण- (447), मृत्यू- (34), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (718)

रायगड: बाधित रुग्ण- (1,238), बरे झालेले रुग्ण- (645), मृत्यू- (51), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टीव रुग्ण- (540)

नाशिक: बाधित रुग्ण- (1,235), बरे झालेले रुग्ण- (942), मृत्यू- (68), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (225)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (165), बरे झालेले रुग्ण- (62), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (95)

धुळे: बाधित रुग्ण- (177), बरे झालेले रुग्ण- (94), मृत्यू- (20), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (63)

जळगाव: बाधित रुग्ण- (781), बरे झालेले रुग्ण- (330), मृत्यू- (74), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (377)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (37), बरे झालेले रुग्ण- (28), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (5)

पुणे: बाधित रुग्ण- (8,463), बरे झालेले रुग्ण- (4,585), मृत्यू- (367), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (3,511)

सोलापूर: बाधित रुग्ण- (1,032), बरे झालेले रुग्ण- (448), मृत्यू- (85), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (499)

सातारा: बाधित रुग्ण- (564), बरे झालेले रुग्ण- (206), मृत्यू- (22), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (336)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (607), बरे झालेले रुग्ण- (213), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (388)

सांगली: बाधित रुग्ण- (126), बरे झालेले रुग्ण- (63), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (59)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (78), बरे झालेले रुग्ण- (8), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (70)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (314), बरे झालेले रुग्ण- (118), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (191)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (1,653), बरे झालेले रुग्ण- (1,095), मृत्यू- (84), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (474)

जालना: बाधित रुग्ण- (154), बरे झालेले रुग्ण- (59), मृत्यू- (2), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (93)

हिंगोली: बाधित रुग्ण- (193), बरे झालेले रुग्ण- (106), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (87)

परभणी: बाधित रुग्ण- (73), बरे झालेले रुग्ण- (24), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (48)

लातूर: बाधित रुग्ण- (125), बरे झालेले रुग्ण- (69), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (53)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (91), बरे झालेले रुग्ण- (40), मृत्यू- (2), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (49)

बीड: बाधित रुग्ण- (49), बरे झालेले रुग्ण- (27), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टीव रुग्ण- (21)

नांदेड: बाधित रुग्ण- (135), बरे झालेले रुग्ण- (99), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (30)

अकोला: बाधित रुग्ण- (647), बरे झालेले रुग्ण- (358), मृत्यू- (33), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव रुग्ण- (255)

अमरावती: बाधित रुग्ण- (261), बरे झालेले रुग्ण- (158), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (97)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (148), बरे झालेले रुग्ण- (99), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (48)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (74), बरे झालेले रुग्ण- (45), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (26)

वाशिम: बाधित रुग्ण- (8), बरे झालेले रुग्ण- (6), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (2)

नागपूर: बाधित रुग्ण- (635), बरे झालेले रुग्ण- (392), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (232)

वर्धा: बाधित रुग्ण- (9), बरे झालेले रुग्ण- (2), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (6)

भंडारा: बाधित रुग्ण- (37), बरे झालेले रुग्ण- (12), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (25)

गोंदिया: बाधित रुग्ण- (66), बरे झालेले रुग्ण- (48), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (18)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (27), बरे झालेले रुग्ण- (25), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (2)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (39), बरे झालेले रुग्ण- (12), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (27)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (63), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (18), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव रुग्ण- (45)

एकूण: बाधित रुग्ण-(74,860), बरे झालेले रुग्ण- (32,329), मृत्यू- (2,587), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(9),ॲक्टीव रुग्ण-(39,935)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3,661 झोन क्रियाशील असून आज एकूण 18 हजार 950 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 71.48 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.