Maharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्क्यांवर, आज 14,910 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात शनिवारी (दि.12) 14 हजार 910 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजवर महाराष्ट्रातील 56 लाख 31 हजार 767 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 95.48 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात आज 10 हजार 697 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 एवढी झाली आहे. आजघडीला राज्यात 1 लाख 55 हजार 474 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात 360 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 08 हजार 333 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 78 लाख 34 हजार 054 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 63 हजार 227 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 807 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 55 लाख 20 हजार 977 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शुक्रवारी (11 जून) 2 लाख 48 हजार 685 लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.