Maharashtra Corona Update : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या खाली

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 2 हजार 740 नवीन क़रोना बाधित आढळून आले असून, 3 हजार 233 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, आज 27 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या खाली आली आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 00 हजार 617 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 09 हजार 021 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.05 टक्के एवढे झाले आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 49 हजार 880 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 169 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत 5 कोटी 60 लाख 88 हजार 114 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 99 हजार 192 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 883 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.