Maharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांवर, आज 5,544 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5 हजार 544 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 20 हजार 059 एवढी झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सध्या 90 हजार 997 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज 4 हजार 362 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 16 लाख 80 हजार 926 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.36 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 47 हजार 071 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के एवढे आहे.

राज्यात 1 कोटी 8 लाख 4 हजार 422 नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 लाख 20 हजार 059 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 26 हजार 555 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 814 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यातील 90 हजार 997 सक्रिय रुग्णांपैकी पुण्यात सर्वाधिक 19 हजार 658, ठाण्यात 16 हजार 338, मुंबई मध्ये 15 हजार 610, नागपूर मध्ये 4 हजार 132 आणि अहमदनगर जिल्ह्यात 4 हजार 102 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.