Maharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांवर, आज 58,952 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 58 हजार 952 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांच्या पुढे गेली असून, सध्या 6 लाख 12 हजार 070 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 लाख 78 हजार 160 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 29 लाख 05 हजार 721 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.21 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 58 हजार 804 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.66 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 34 लाख 55 हजार 206 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 494 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 28 लाख 02 हजार 200 नमूने तपासण्यात आले आहेत.

राज्यात आजपासून (बुधवार, दि.14) रात्री 8 पासून पुढचे 15 संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे, यादरम्यान कुणालाही कारण नसताना बाहेर पडता येणार नाही. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.