Maharashtra Corona Update : राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील 24 तासांत राज्यात 3 हजार 959 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर 6 हजार 748 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत आली असून सध्या 99 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या 17 लाख 14 हजार 273 एवढी झाली आहे. त्यापैकी 15 लाख 69 हजार 090 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 99 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सुधारला असून तो 91.53 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 150 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात 45 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असून राज्यातील रुग्ण सकारात्मकतेचा दर 18.29 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 93 लाख 78 हजार 531 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 17 लाख 14 हजार 273 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 10 लाख 71 हजार 163 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 9 हजार 799 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.