Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 8 लाखांच्या पुढे, आज 15,765 नवे रुग्ण

दिलासादायक बाब म्हणजे आजवर 5 लाख 84 हजार 537 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात दिवसेंदिवस वेगाने रुग्ण संख्या वाढत असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येने 8 लाखांचा टप्पा पार केला आहे. आज दिवसभरात 15 हजार 765 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 320 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 8 लाख 08 हजार 306 एवढी झाली आहे. त्यापैकी राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 523 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आजवर 5 लाख 84 हजार 537 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज दिवसभरात 10 हजार 978 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 72.32 टक्के एवढा आहे.

आज 320 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या 24 हजार 903 इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 3.08 टक्के आहे.

आजवर करण्यात आलेल्या 42 लाख 11 हजार 752 तपासलेल्या नमुन्यांपैकी 8 लाख 08 हजार 306 (19.19%) एवढे सकारात्मक आले आहेत.

राज्यात सध्या 13 लाख 79 हजार 519 लोक होम क्वारंटाइन आहेत तर, 36 हजार 020 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

गेले काही दिवस राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी सरकारकडे होत आहे. परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतला आहे.

यासंदर्भात मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी भाविकांच्या माहितीसाठी यासंदर्भातील पत्रक काढलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.