Maharashtra Corona Update : कोरोना बाधितांची संख्या 19.50 लाखांवर, राज्यात आज 3,160 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3 हजार 160 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. या वाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 50 हजार 171 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 2 हजार 828 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यात आतापर्यंत 18 लाख 50 हजार 189 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 49 हजार 067 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात राज्यात 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 49 हजार 067 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.55 टक्के एवढा आहे तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के एवढं झाले आहे.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 30 लाख 61 हजार 976 चाचण्या पैकी 19 लाख 50 हजार 171 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 557 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 788 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.