Maharashtra Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या पुढे, मात्र सक्रिय रुग्ण 83 हजार 295

Maharashtra Corona Update: The number of corona patients is more than two lakh, but the active patients are 83 thousand 295 राज्यातील 1,08,082 रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई

एमपीसी न्यूज – राज्यात शनिवारी कोरोनाच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 7,074 नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या राज्यात 83 हजार 295 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. शनिवारी 3395 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 1 लाख 8 हजार 82 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.2 टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 10 लाख 80 हजार 975 नमुन्यांपैकी 2 लाख 64 नमुने पॉझिटिव्ह (18.51 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 96 हजार 38 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 41 हजार 566 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात शनिवारी 295 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 124 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 171 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.33 टक्के एवढा आहे. कोविडबाधित मृत्यू प्रकरणाची नोंद जागतिक तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसारच; राज्य शासनानेच दिले समायोजनाचे आदेश होते, असे आरोग्य खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील 48 तासात झालेले 124 मृत्यू हे मुंबई मनपा- 68, ठाणे मनपा- 3, नवी मुंबई मनपा- 3, कल्याण-डोंबिवली मनपा- 5, उल्हासनगर मनपा-1, भिवंडी निजामपूर मनपा- 2, पालघर-1, वसई-विरार मनपा- 4, जळगाव- 4, जळगाव मनपा- 4, पुणे- 1, पुणे मनपा- 7, पिंपरी-चिंचवड मनपा- 5, सोलापूर- 4, सोलापूर मनपा- 2, औरंगाबाद – 3, औरंगाबाद मनपा – 3, लातूर मनपा- 1, अकोला- 2, अकोला मनपा- 1, यवतमाळ- 1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण – 83,237, बरे झालेले रुग्ण- 53,363, मृत्यू- 4,830, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 8, ॲक्टिव्ह रुग्ण- 24,936

ठाणे: बाधित रुग्ण- 45,833, बरे झालेले रुग्ण- 17,851, मृत्यू- 1,254, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 26,727

पालघर: बाधित रुग्ण- 7,173, बरे झालेले रुग्ण- 2,900, मृत्यू- 122, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,151

रायगड: बाधित रुग्ण- 5,585, बरे झालेले रुग्ण- 2,686, मृत्यू- 106, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,791

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 699, बरे झालेले रुग्ण- 458, मृत्यू- 27, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 214

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 239, बरे झालेले रुग्ण- 164, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 70

पुणे: बाधित रुग्ण- 26,956, बरे झालेले रुग्ण- 13,064, मृत्यू- 841, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 13,051

सातारा: बाधित रुग्ण- 1,274, बरे झालेले रुग्ण- 763, मृत्यू- 48, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 462

सांगली: बाधित रुग्ण- 417, बरे झालेले रुग्ण- 247, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 159

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 895, बरे झालेले रुग्ण- 732, मृत्यू- 12, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 151

सोलापूर: बाधित रुग्ण- 3,106, बरे झालेले रुग्ण- 1,673, मृत्यू- 292, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,140

नाशिक: बाधित रुग्ण- 4,933, बरे झालेले रुग्ण- 2,820, मृत्यू- 223, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,890

अहमदनगर: बाधित रुग्ण- 508, बरे झालेले रुग्ण- 357, मृत्यू- 15, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 136

जळगाव: बाधित रुग्ण- 4,026, बरे झालेले रुग्ण- 2,263, मृत्यू- 268, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,495

नंदूरबार: बाधित रुग्ण- 197, बरे झालेले रुग्ण- 83, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 105

धुळे: बाधित रुग्ण- 1,233, बरे झालेले रुग्ण- 692, मृत्यू- 58, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 481

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 6,271, बरे झालेले रुग्ण- 2,703, मृत्यू- 283, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,285

जालना: बाधित रुग्ण- 683, बरे झालेले रुग्ण- 380, मृत्यू- 24, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 279

बीड: बाधित रुग्ण- 129, बरे झालेले रुग्ण- 95, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 31

लातूर: बाधित रुग्ण- 404, बरे झालेले रुग्ण- 223, मृत्यू- 22, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 159

परभणी: बाधित रुग्ण – 118, बरे झालेले रुग्ण- 83, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 31

हिंगोली: बाधित रुग्ण- 288, बरे झालेले रुग्ण- 250, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 37

नांदेड: बाधित रुग्ण- 388, बरे झालेले रुग्ण 241, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 133

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 253, बरे झालेले रुग्ण- 182, मृत्यू- 12, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 59

अमरावती: बाधित रुग्ण- 638, बरे झालेले रुग्ण- 446, मृत्यू- 30, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 162

अकोला: बाधित रुग्ण- 1,609, बरे झालेले रुग्ण- 1,182, मृत्यू- 86, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 340

वाशिम: बाधित रुग्ण- 116, बरे झालेले रुग्ण- 81, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 32

बुलढाणा: बाधित रुग्ण- 298, बरे झालेले रुग्ण- 167, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 118

यवतमाळ: बाधित रुग्ण- 329, बरे झालेले रुग्ण- 227, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 91

नागपूर: बाधित रुग्ण- 1,672, बरे झालेले रुग्ण- 1,292, मृत्यू- 15, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 365

वर्धा: बाधित रुग्ण- 17, बरे झालेले रुग्ण- 13, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3

भंडारा: बाधित रुग्ण- 89, बरे झालेले रुग्ण- 77, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 12

गोंदिया: बाधित रुग्ण- 159, बरे झालेले रुग्ण-104, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 53

चंद्रपूर: बाधित रुग्ण- 109, बरे झालेले रुग्ण- 61, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 48

गडचिरोली: बाधित रुग्ण- 72, बरे झालेले रुग्ण- 59, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 12

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 111, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 25, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 86

एकूण: बाधित रुग्ण- 2,00,64, बरे झालेले रुग्ण- 1,08,082, मृत्यू- 8,671, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 16,ॲक्टिव्ह रुग्ण- 83,297

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.