Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना बळींचा आकडा 42 हजारांच्या उंबरठ्यावर

राज्यातील 15.86 लाखांपैकी 13.58 लाख रुग्णांची कोरोनावर मात

0

एमपीसी न्यूज – राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाख 58 हजार 606 वर गेली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, राज्यातील कोरोना बळींचा आकडा 42 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.

राज्यात आज 250 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा 41 हजार 965 वर पोहचला आहे. असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 80 लाख 69 हजार 100 नमुन्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 नमुने पॉझिटिव्ह (19.66 टक्के) आले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 1 लाख 85 हजार 270 एवढी कमी झाली आहे.

राज्यात 23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.