Maharashtra Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्तांची  संख्या अधिक ; 71,966 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णापेक्षा अधिक नोंदवली आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब असून, आज (दि.11) दिवसभरात 71 हजार 966 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 40 हजार 956 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 लाख 79 हजार 929 झाली असून, त्यापैकी 45 लाख 41 हजार 391 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 87.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 793 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 77 हजार 191 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.48 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 35 लाख 91 हजार 783 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 955 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 48 हजार 783 नमूने तपासण्यात आले आहेत.

मागील दोन दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे तर, राज्याचा रिकव्हरी रेट सुधारला आहे.

दरम्यान, राज्यातील निर्बंध 15 मे च्या पुढे देखील वाढवण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.