Maharashtra Corona Update : संसर्गाचा वेग मंदावतोय! आज 34,848 नवे रुग्ण, 59,073 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग मंदावत असल्याचे चित्र आहे. राज्यात नव्याने वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. आज (शनिवारी, दि.15) राज्यात 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 59 हजार 073 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 लाख 44 हजार 063 झाली असून, त्यापैकी 47 लाख 67 हजार 053 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 94 हजार 032 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोनाने 80 हजार रुग्णांचा बळी घेतला आहे. आज 960 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 80 हजार 512 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे तर, राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 89.20 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात 34 लाख 47 हजार 653 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 727 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 08 लाख 39 हजार 404 नमूने तपासण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती पाच लाखांच्या खाली आली आहे. लॉकडाऊनचा कोरोना संसर्गावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.