Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के; आज 14,114 नवे रुग्ण

राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार 114 रुग्ण बरे झाले आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यात दिवसभरात आज 14 हजार 492 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 297 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 9 हजार 241 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के एवढे आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार 114 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या 1 लाख 69 हजार 516 रुग्णांवर सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 297 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आजवर तब्बल रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 21,995 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत सर्वाधिक 7,388 जण दगावले आहेत. तर पुणे जिल्ह्यात 3,674 आणि ठाणे जिल्ह्यात 3,537 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.27 टक्के एवढा आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 1 लाख 47 हजार 674 एवढे रुग्ण आढळले आहेत, यापैकी 1 लाख 500 रुग्ण बरे झाले आहेत, तर 43 हजार 497 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात पुण्यामध्येच सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे मुंबईत 1 लाख 35 हजार 362 कोरोनाबाधित आहेत, यापैकी 1 लाख 09 हजार 368 रुग्ण बरे झाले आहेत, तर 18 हजार 301 सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 35 लाख 66 हजार 288 नमुन्यांपैकी 6 लाख 71 हजार 942 नमुने पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आले आहेत. राज्यात 12 लाख 11 हजार 608 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 371 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.