Maharashtra Corona Update : राज्यात संसर्गाचा ‌वेग मंदावतोय, आज‌ 3,645 नवे रूग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना संसर्गाचा ‌वेग मंदावत आहे. आज 3 हजार 645 नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर, 84 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 9 हजार 905 करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात नव्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे तर, बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे.

राज्यात आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 70 हजार 660 इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता 89.2 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 3 हजार 645 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 48 हजार 665 इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात आज‌ 84 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 86 लाख 45 हजार 195 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 48 हजार 665 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 25 लाख 30 हजार 900 लोक होमक्वारंटाइन आहेत. तर 13 हजार 690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या 1 लाख 34 हजार 137 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.