-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maharashtra Corona Update : राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.34 टक्के

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.34 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या 24  तासात 7 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 60 लाख 16  हजार 506 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज, गुरुवारी 7 हजार 302 नव्या रुग्णांची नोंद झाली.

आतापर्यंत 4 कोटी 62 लाख 64 हजार 59 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 62 लाख 45 हजार 57 जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे प्रमाण 13.5 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 94 हजार 168 सक्रिय रुग्ण आहेत.

सध्या एकूण 5 लाख 51 हजार 872 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 3 हजार 743 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.09 टक्के इतका आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्के

मुंबईत गेल्या 24  तासात 392 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 502 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 7 लाख 8 हजार 716 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के इतके आहे. सध्या मुंबईत 5 हजार 897 रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर हा 1 हजार 152 वर पोहोचला आह. 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान रुग्ण वाढीचा दर 0.06 टक्के इतका होता.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn