Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,365 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात आज देखील उच्चांकी रुग्ण वाढ झाली. दिवसभरात राज्यात 3 हजार 365 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच, 3 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 78 हजार 708 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी आज 3 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात सध्या 36 हजार 201 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 95.70 टक्के एवढा झाला आहे. राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर व नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.