Maharashtra Corona Update : राज्यात आज 17,141 रुग्ण कोरोनामुक्त, 12,258 नव्या रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – राज्यात आज, मंगळवारी नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 17 हजार 141 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 12 हजार 258 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 लाख 65 हजार 911 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 लाख 79 हजार 726 जण कोरोनामुक्त झाले.

सध्या 2 लाख 47 हजार 023 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 38 हजार 717 जण कोरोनामुळे दगावले आहेत.

राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होताना दिसत असून आज नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 80.48 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 2.64 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 72 लाख 41 हजार 376 नमूणे तपासण्यात आले आहेत. 14 लाख 65 हजार 911 सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 22 लाख 38 हजार 351 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 25 हजार 828 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती हळुहळु सुधारत असून पुढील पंधरा दिवसांत उद्योगांना लागणारा ऑक्सिजन टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

दरम्यान, करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.