Maharashtra Corona Update : राज्यात आज सर्वाधिक 60,212 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोनाची आजवरची सर्वाधिक एकदिवसीय रुग्ण वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 60 हजार 212 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, आज 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 लाख 19 हजार 208 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 28 लाख 66 हजार 097 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 टक्के एवढं झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात सध्या 5 लाख 93 हजार 042 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 58 हजार 526 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत.

राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.66 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 32 लाख 94 हजार 398 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 30 हजार 399 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 25 लाख 60 हजार 051 नमूने तपासण्यात आले आहेत.

राज्यात उद्यापासून (बुधवार, दि.14) रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली असून, यादरम्यान कुणालाही कारण नसताना बाहेर पडता येणार नाही. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.