Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,697 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 2 हजार 2697 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली, तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 06 हजार 354 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 10 हजार 521 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 43 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 3 हजार 694 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 740 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 56 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.53 टक्के एवढा आहे.

राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार, बुधवारी आणि गुरूवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण 74 हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

राज्यात सर्वात जास्त बीड जिल्ह्यात 151 टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. शुक्रवार (दि.22) सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.