Maharashtra Corona Update : राज्यात आज दोन हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 30 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात दोन हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. आज 1 हजार 842 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 10 हजार 948 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 15 हजार 344 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 43 हजार 561 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 3 हजार 80 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 815 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 30 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.53 टक्के एवढा आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 42 लाख 57 हजार 998 नमून्यांपैकी 20 लाख 10 हजार 948 एवढे नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 07 हजार 971 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 360 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.