Maharashtra Corona Update : राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.58 टक्के

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. आज दिवसभरात 7 हजार 30 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 37 हजार 516 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.58 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 2 हजार 992 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 30 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 33 हजार 266 एवढी झाली आहे.

त्यापैकी 19 लाख 43 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.58 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 30 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 169 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.52 टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 3 लाख 18 हजार 735 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 47 लाख 64 हजार 744 नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 लाख 33 हजार 266 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 82 हजार 181 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 093 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.