Maharashtra Corona Update : राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.9 टक्के

एमपीसीन्यूज : दिवसभरात राज्यात 9 हजार 43 रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज, मंगळवारी नोंद झाली. तसेच राज्यात 188  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 57 लाख 42  हजार 258 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.9  टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98  टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3   कोटी 98 लाख 86 हजार 554  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59   लाख  87 हजार 529  (15.01टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4 हजार 196  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 23 हजार 340 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी 5  लाख 52  हजार 909  जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत मागील बऱ्याच दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.