Maharashtra Corona Update : आज 11,060 जणांना डिस्चार्ज, आतापर्यंत 15.62 लाख रुग्ण झाले बरे

एमपीसी न्यूज – राज्यात आज 11 हजार 060 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 15 लाख 62 हजार 342 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.35 टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात 5 हजार 027 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 161 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 10 हजार 314 एवढी झाली आहे.

राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 02 हजार 099 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या 44 हजार 965 एवढी झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे.

सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 22 हजार 717 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल मुंबईत 16 हजार 817 तर ठाण्यात 15 हजार 087 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज मोठ्या प्रमाणावर बरे होणा-या रुग्णांमुळे राज्याचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली असून ती सध्या 1 लाख 02 हजार 099 एवढी झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 93 लाख 18 हजार 544 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 10 हजार 314 (18.35 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 10 लाख 59 हजार 499 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 8 हजार 879 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.