Maharashtra Corona Update : आज 12,326 जण कोरोनामुक्त तर नवीन 7,760  रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – राज्यात सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात 12 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 7 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 57 हजार 956 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यंत राज्यभरात 2 लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 63.73 टक्के आहे. तर सध्या 1 लाख 42  हजार 151 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे यासह राज्यातील एकूण मृतांची संख्या 16,142 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के एवढा आहे. तर, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 65.37 टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण पुणे येथे आहेत. पुण्यात सध्या 41 हजार 664 असून त्यानंतर बत्तीस हजार 191 ॲक्टिव रूग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. मुंबईत 20 हजार 528 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत. मुंबईत आज 970 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत बाधितांची संख्या 1लाख 17 हजार 421 एवढी झाली आहे. आज 46 जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या 6490 एवढी झालीय. आज 1790 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.  तर आतापर्यंत 90089 डिस्चार्ज मिळाला आहे. शहरात तर 20546 सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 23 लाख 52 हजार 047 नमुन्यांपैकी 4 लाख 57 हजार 956 नमुने पॉझिटिव्ह (19.47 टक्के) आले आहेत. राज्यात 9 लाख 44 हजार 442 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 43 हजार 906 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.