Maharashtra Corona Update : आज 17,066 नवे रुग्ण, 15,789 जणांना डिस्चार्ज

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 77 हजार 374 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद वाढ होत होती. आज राज्यात 20 हजारांहून कमी 17,066 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर, 15,789 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 77 हजार 374 एवढी झाली आहे.

त्यापैकी 7 लाख 55 हजार 850 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यात 2 लाख 91 हजार 256 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 15,789 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 70.16 टक्के एवढा आहे. राज्यात आज 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर 2.77 एवढा आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या 53 लाख 21हजार 116 नमुन्यांपैकी 10 लाख 77 हजार 374 नमुने सकारात्मक आले आहेत.

सध्या राज्यात 17 लाख 12 हजार 160 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 37 हजार 198 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.