Maharashtra Corona Update : आज 19,423 जण कोरोनामुक्त, 20,482 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 19 हजार 423 जण कोरोनामुक्त झाले तर, 20 हजार 482 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 11 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 10 लाख 97 हजार 856 एवढी झाली आहे.

त्यापैकी 7 लाख 75 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या 2 लाख 91 हजार 797 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 515 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आजवर 30 हजार 409 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

राज्यातील रिकव्हरी रेट 70.62 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 2.77 टक्के आहे. आजवर करण्यात आलेल्या 54 लाख 09 हजार 060 चाचण्या पैकी 10 लाख 97 हजार 856 नमुने सकारात्मक आले आहेत.

सध्या 17 लाख 34 हजार 164 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 37 हजार 225 संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

कोविड-19 च्या निदानासाठी सिटीस्कॅन (HRCT) चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजार पेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT)चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करण्यासंदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे आरोग्यमंत्री   टोपे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.