Maharashtra Corona Update : आज 3,717 नवे रुग्ण, 3,083 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3 हजार 717 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून, 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 3 हजार 83 रुग्ण उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 80 हजार 416 एवढी झाली आहे. त्यापैकी 17 लाख 57 हजार 005 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 104 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत राज्यात जवळपास 48 हजार 209 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 93.44 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 2.56 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 02 हजार 457 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 80 हजार 416 एवढे नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 12 हजार 587 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 403 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.