Maharashtra Corona Update : आज 535 कोरोना रुग्णांची नोंद, 454 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 535 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी 454 रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित आहेत. एकट्या नागपुरात 454 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 963 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, राज्यात आतापर्यंत 77 लाख 16 हजार 674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के आहे. राज्यात सध्याच्या घडीला 4,038 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 27,025 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 82 लाख 14 हजार 557 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.