Maharashtra Corona Update : राज्यात आज‌ 5,363 नवे रूग्ण तर, 115 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आज राज्यात 5 हजार 363 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 115 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.39 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज 7 हजार 836 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दिवसभरातील वाढीसह राज्यातील राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 54 हजर 028 झाली आहे. त्यापैकी एकूण 14 लाख 78 हजार 499 कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 31 हजार 544 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 87 लाख 33 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 54 हजर 028 (19.01 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 28 हजार 907 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्राप्रमाणे देशातही रुग्णांची संख्या घसरणीला लागली असून त्यामुळे बेफिकीर न होता सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.

सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.