Maharashtra Corona Update : आज 67,468 नवे रुग्ण; सात लाखांच्या उंबरठ्यावर सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात कडक संचारबंदी असतानाही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 67 हजार 468 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, ती सात लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 लाख 27 हजार 827 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 32 लाख 68 हजार 449 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 54 हजार 985 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.14 टक्के एवढं झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 95 हजार 747 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 61 हजार 911 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 39 लाख 15 हजार 292 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 384 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 46 लाख 14 हजार 480 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.