Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,241 रुग्ण झाले बरे, कोरोनामुक्तांची संख्या 15 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज – राज्यात आज 8 हजार 241 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.84 टक्के एवढं झाले आहे. आज, शुक्रवारी राज्यात 6 हजार 190 नव्या रुग्णांची वाढ झाली, तर 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 लाख 72 हजार 858 एवढी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 15 लाख 03 हजार 050 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्यात सध्या 1 लाख 25 हजार 418 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 127 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांची संख्या 43 हजार 837 एवढी झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 89 लाख 06 हजार 826 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 16 लाख 72 हजार 858 चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.

राज्यात सध्या 25 लाख 29 हजार 462 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 12 हजार 411जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यातील मृतांची संख्या घटत असून राज्यातील मृत्यूदर 2.62 टक्के एवढा आहे.

‌राज्यातील आजवर नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 15 लाख 03 हजार 050 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 89.84 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली असून, सध्या सव्वा लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घटत असलेली सक्रिय रुग्णांची संख्या ही राज्यासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.