Maharashtra Corona Update : आज 21 हजार 656 रुग्णांची वाढ; 22 हजार 078 बाधित रुग्ण बरे

एमपीसी न्यूज – राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 21 हजार 656 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 22 हजार 078 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आज दिवसभरात 407 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 67 हजार 496 एवढी झाली आहे. त्यापैकी एकूण 8 लाख 34 हजार 432 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात एकूण 3 लाख 887 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 407 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 31 हजार 791 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.72 टक्के आहे तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.47% झाले आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 56 लाख 93 हजार 345 नमुन्यांपैकी 11 लाख 67 हजार 496 नमुने पॉझिटिव्ह (20.51 टक्के) आले आहेत.

राज्यात 17 लाख 78 हजार 792 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 767 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.