Maharashtra Corona Update : राज्यात आज 9615 रुग्णांची भर, मृतांची संख्या 13 हजारांवर

Today, the state has a record high of 9615 patients, with the death toll at 13,000: राज्यातल्या एकूण रुग्णांचीं संख्या 3,51,117 वर गेली आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची भर पडली. गेल्या 24 तासांत 9615 रुग्ण सापडले आहेत. तर  278 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचीं संख्या 3,51,117 वर गेली आहे.

राज्यात सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा 1,43, 714 एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 1,99,967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज  5714 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातल्या मृतांची एकूण संख्या ही 13 हजार 132 एवढी झाली आहे.

मुंबईत आज 1057 नवे रुग्ण सापडले. तर 54 जणांचा मृत्यू झाला. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 285 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 17,150 झाली आहे.

पुणे विभागातील 44 हजार 825  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 77 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 30 हजार 803 आहे.

विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 849 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.60 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

दरम्यान, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद इथं कोरोनाचा वाढता आलेख आता सपाट झाला आहे. मात्र, याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असा नाही, पावसामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता दिल्लीतील एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 1,06,980, बरे झालेले रुग्ण- 78,259, मृत्यू- 5,984, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 294, ॲक्टिव्ह रुग्ण- 22,443

ठाणे: बाधित रुग्ण- 83,189, बरे झालेले रुग्ण- 43,777, मृत्यू- 2,249, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 37,162

पालघर: बाधित रुग्ण- 13,543, बरे झालेले रुग्ण- 7,752, मृत्यू- 289, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 5,502

रायगड: बाधित रुग्ण- 13,605, बरे झालेले रुग्ण- 8,060, मृत्यू- 257, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 5,286

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 1,428, बरे झालेले रुग्ण- 800, मृत्यू- 49, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 579

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 306, बरे झालेले रुग्ण- 247, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 54

पुणे: बाधित रुग्ण- 69,919, बरे झालेले रुग्ण- 24,415, मृत्यू- 1,666, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 43,838

सातारा: बाधित रुग्ण- 2,862, बरे झालेले रुग्ण- 1,580, मृत्यू- 96, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,185

सांगली: बाधित रुग्ण- 1,230, बरे झालेले रुग्ण- 590, मृत्यू- 42, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 598

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 3,213, बरे झालेले रुग्ण- 1,008, मृत्यू- 64, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,114

सोलापूर: बाधित रुग्ण- 7,251, बरे झालेले रुग्ण- 3,340, मृत्यू- 423, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,481

नाशिक: बाधित रुग्ण- 11,740, बरे झालेले रुग्ण- 6,478, मृत्यू- 409, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,853

अहमदनगर: बाधित रुग्ण- 2,574, बरे झालेले रुग्ण- 1,138, मृत्यू- 48, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,388

जळगाव: बाधित रुग्ण- 8.746, बरे झालेले रुग्ण- 5,782, मृत्यू- 452, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,512

नंदूरबार: बाधित रुग्ण- 491, बरे झालेले रुग्ण- 232, मृत्यू- 21, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 238

धुळे: बाधित रुग्ण- 2,287, बरे झालेले रुग्ण- 1,438, मृत्यू- 88, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 759

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 11,246, बरे झालेले रुग्ण- 6,039, मृत्यू- 431, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,776

जालना: बाधित रुग्ण- 1,610, बरे झालेले रुग्ण- 761, मृत्यू- 64, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 785

बीड: बाधित रुग्ण- 478, बरे झालेले रुग्ण- 189, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 275

लातूर: बाधित रुग्ण- 1,358, बरे झालेले रुग्ण- 649, मृत्यू- 70, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 639

परभणी: बाधित रुग्ण- 420, बरे झालेले रुग्ण- 183, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 220

हिंगोली: बाधित रुग्ण- 499, बरे झालेले रुग्ण- 328, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 162

नांदेड: बाधित रुग्ण- 1,142, बरे झालेले रुग्ण 533, मृत्यू- 50, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 559

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 619, बरे झालेले रुग्ण- 387, मृत्यू- 33, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 199

अमरावती: बाधित रुग्ण- 1,553, बरे झालेले रुग्ण- 1,048, मृत्यू- 50, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 455

अकोला: बाधित रुग्ण- 2,289, बरे झालेले रुग्ण- 1,726, मृत्यू- 103, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 459

वाशिम: बाधित रुग्ण- 449, बरे झालेले रुग्ण- 266, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 174

बुलढाणा: बाधित रुग्ण- 905, बरे झालेले रुग्ण- 247, मृत्यू- 25, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 633

यवतमाळ: बाधित रुग्ण- 691, बरे झालेले रुग्ण- 431, मृत्यू- 23, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 237

नागपूर: बाधित रुग्ण- 3,128, बरे झालेले रुग्ण- 1,538, मृत्यू- 40, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,549

वर्धा: बाधित रुग्ण- 104, बरे झालेले रुग्ण- 45, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 56

भंडारा: बाधित रुग्ण- 200, बरे झालेले रुग्ण- 170, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 28

गोंदिया: बाधित रुग्ण- 233, बरे झालेले रुग्ण- 210, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 20

चंद्रपूर: बाधित रुग्ण- 291, बरे झालेले रुग्ण- 183, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 108

गडचिरोली: बाधित रुग्ण- 221, बरे झालेले रुग्ण- 138, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 82

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 317, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 44, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 273

एकूण: बाधित रुग्ण- 3,57,117, बरे झालेले रुग्ण- 1,99,967, मृत्यू- 13,132, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 304,ॲक्टिव्ह रुग्ण- 1,43,714

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.