-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. राज्यभरात आज 6 हजार 270 नवीन कोरोना बाधित आढळले असून, 13 हजार 758 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच, 94 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 79 हजार 051 एवढी झाली आहे. त्यापैकी 57 लाख 33 हजार 215 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आजघडीला राज्यात 1 लाख 24 हजार 398 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

राज्यात आज 94 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 18 हजार 313 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.89 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 96 लाख 69 हजार 693 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 71 हजार 685 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 472 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn